मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2024 (17:04 IST)

शाळेत मुलींना पॉर्न दाखवून करायचा शोषण, नापास करण्याची धमकी द्यायचा, आरोपी मुख्याध्यापकाला अटक

UP school principal held for sexually abusing girl students
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील फिल्म दाखवून त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप मुख्याध्यापकांवर करण्यात आला आहे. यानंतर त्याने विद्यार्थिनींना धमकावल्याचाही आरोप आहे. आरोपानुसार मुख्याध्यापकांनी पीडित विद्यार्थिनींना म्हटले की याबाबत कुटुंबीयांना सांगितले तर ते परीक्षेत नापास व्हाल.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रताप सिंह असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की 25 मार्च रोजी त्याला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्रताप सिंहने शाळेतील विद्यार्थिनींना अयोग्य पद्धतीने स्पर्श केले. या कारणामुळे 9 ते 12 वयोगटातील सर्व मुलींनी शाळेत जाणे बंद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील फिल्म दाखवल्याचा आरोपही केला आहे.
 
आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) च्या संबंधित कलमांतर्गत अर्निया पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.