शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उर्मिला मातोंडकरला सासू-सासर्‍यांची वाटतेय काळजी, मोदी सरकारहून नाराज

नांदेड- अभिनेत्री ते राजकारणात शिरलेल्या उर्मिला मातोंडकरने कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कठोर असल्यामुळे मोदी सरकारावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की मागील 22 दिवसांपासून त्यांचा नवर्‍याचा आपल्या आई-वडिलांशी संवाद होत नाहीये.
 
काश्मीर मुळाचे मोहसिन अख्तर मीर यांच्याशी विवाह करणार्‍या उर्मिलाने सांगितले प्रश्न केवळ कलम 370 हटवण्याचा नाही परंतू हे अमानुषपणे केले गेले.
 
त्यांनी सांगितले की माझे सासू-सासरे तेथे राहतात. दोघांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे. आज 22 वा दिवस आहे, मी आणि माझा नवरा त्यांच्याशी बोलू शकलेलो नाहीत. त्याच्याकडे औषध उपलब्ध आहे वा नाही हे देखील कळू शकत नाहीये.
 
उर्मिलाने उत्तर मुंबईहून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना भाजप उमेदवार गोपाल शेट्टी यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला होता.