Uttar Pradesh election results : पक्ष स्थिति
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडल्याचे पाच राज्यांमधील निकालांवरुन स्पष्ट झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले असून नोटाबंदीच्या निर्णयावरुन मत खेचण्याची मोदी – शहा यांची रणनिती यशस्वी ठरल्याचे यातून दिसते. निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी उत्तरप्रदेशमधील जनता भाजपसोबत पहाडासारखी उभी राहिली अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेश एकूण जागा 403
|
पक्ष |
जिंकले |
|
भाजप |
325 |
|
सपा + काँग्रेस |
54 |
|
बसप |
19 |
|
इतर |
5 |