Varanasi Gym Death जिममध्ये वार्मअप करताना तीव्र वेदना, व्हिडिओ व्हायरल
Varanasi Gym Death वाराणसीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिममध्ये गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, हा व्यक्ती अनेक वर्षांपासून जिम करत होता, परंतु घटनेच्या दिवशी त्याने जिममध्ये वॉर्मअप सुरू करताच त्याला डोकेदुखी होऊ लागली.
हे प्रकरण वाराणसीच्या चेतगंज पोलीस स्टेशन परिसरातील सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार दीपक गुप्ता (32) अनेक वर्षांपासून जिममध्ये व्यायाम करत होता. दररोज प्रमाणे दीपक 30 एप्रिल रोजी जिमला गेला होता पण अचानक त्याची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दीपक वॉर्मअप केल्यानंतर एका जागी बसलेला दिसत आहे. तो डोके धरून बसलेला दिसतो. असे दिसते की त्याला डोक्यात तीव्र वेदना होत आहे. यानंतर अचानक दिपक खाली पडला. तेथे उपस्थित असलेले लोक त्याला उचलण्यासाठी धावले आणि त्यानंतर दीपकला रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले. मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. दीपकचा भाऊ दिलीपने सांगितले की, तो नेहमीप्रमाणे जिमला गेला होता. काही वेळाने फोन आला की तो जिममध्ये आजारी पडला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
जिममध्ये पोहोचलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्यक्तीच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.