वर्दाह चक्रीवादळाचा धोका, तमिलनाडु आणि आंध्रप्रदेशात, अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ वर्दाह आज दुपारपर्यंत चेन्नईत धडकणार आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीतल्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला १८० किलोमीटरवर आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ताशी ४० ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. चेन्नईत अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफचे ७ चमू तामिळनाडूत तर ६ चमू आंध्र प्रदेशात तैनात ठेवण्यात आले आहेत. भारतीय वायुसेनेलाही या वादळासंदर्भातला हाय अलर्ट पाठवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकराने वादळाने प्रभावित होऊ शकतील अशा भागांत आज सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.