दक्षिण भारत वादळात होरपळला
वरदाह वादळ आता चेन्नईच्या किनारपट्टीवर आले आहे. वादळामुळे चेन्नईसह तामिळनाडूतल्या अनेक भागात सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीतल्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी केंद्र सरकारने मदत दली आहे.
वरदाह वादळाचे दोन बळी झाले आहेत. दुपारी 2 ते 4च्या सुमारास वरदाह चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनार्यावर धडकलं होत. आंध्र प्रदेशवरही वादळाचं सावट, 50 हजार जणांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. तामिळनाडूत 7 हजार 357 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तामिळनाडूत आज शाळा – कॉलेजेस आणि अनेक ऑफिसेस बंद ठेवली आहेत. महाराष्ट्राच्या शेजारी ‘वरदाह’, मराठवाडासह विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.