1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (10:33 IST)

गुजरातमध्ये हिंसाचार भडकला !वडोदरा येथे दोन गटाच्या लोकांमध्ये हाणामारी

Violence erupts in Gujarat! Two groups clash in Vadodara गुजरातमध्ये हिंसाचार भडकला !वडोदरा येथे दोन गटाच्या लोकांमध्ये हाणामारी
देशातील जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ताजे प्रकरण आहे, जिथे रविवारी रात्री जुन्या शहर परिसरातील रावपुरा रोडवर झालेल्या अपघातानंतर उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनेत किमान तीन जण जखमी झाले. त्याचबरोबर या घटनेपासून पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांना दंगलीप्रकरणी अटक केली आहे.
 
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर वाहनधारकांमध्ये वाद झाला आणि काही वेळातच दोन्ही समुदायांचे सदस्य त्यात सामील झाले. काही वेळाने परिस्थिती आणखीनच बिघडल्याने काही हल्लेखोरांनी दगडफेक करून वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी धार्मिक स्थळांवर हल्ला केला आणि तोडफोड केली.अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या 
 
वडोदरा शहर पोलीस आयुक्त शमशेर सिंग यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, वडोदरातील रावपुरा भागात रविवारी दोन मोटारसायकलची धडक झाली.रस्त्यावरील अपघातावरून हाणामारी झाली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. आता परिस्थिती सामान्य आहे. आम्ही तक्रार नोंदवली असून 22 जणांना अटक करण्यात आली आहे.  संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 
 
वडोदरा पोलीस आयुक्त यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. ते म्हणाले की, कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला काही बातम्या ऐकू येत असल्यास, 100 डायल करून पोलिसांशी त्याची खात्री करा.