शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (16:51 IST)

मतदान करा, सिनेमांच्या तिकीटात 15 टक्के सूट मिळवा

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी  पुण्यात मल्टीप्लेक्स आणि हॉटेल असोसिएशननं एक नवा निर्णय घेतला आहे. 21 फेब्रुवारीला मतदान करणाऱ्या मतदारांना पुण्यातील मल्टीप्लेक्समध्ये सिनेमांच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर दुसरी हॉटेल असोसिएशननंही असाच एक निर्णय घेतला आहे. मतदारांना 21 फेब्रुवारीला हॉटेलमध्ये मिष्टान्न (डेझर्ट) देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन मल्टीप्लेक्स आणि हॉटेल असोसिएशन केले आहे.