शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (15:23 IST)

चंद्रयान 3 : प्रज्ञान रोव्हरला उद्या जाग आली नाही तर काय होईल?

- लक्काजू श्रीनिवास
भारत 22 सप्टेंबरच्या सूर्योदय होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र सूर्योदय पृथ्वीवरचा नाही तर चंद्रावरचा.
 
त्या दिवशी इस्रो चंद्रावर जाऊन झोपी गेलेल्या चांद्रायन-3 विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागं करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
विक्रम लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचला आहे. विक्रम लँडर आणि रोव्हरचं जीवनमान 14 दिवसांचं आहे.
 
23 ऑगस्टला चंद्रावर पहाट होणार होती. त्यामुळे लँडर त्या दिवशी तिथे लँड झाला. इस्रोने लँडर आणि रोव्हरला 4 सप्टेंबरला झोपवलं होतं. कारण त्या दिवशी चंद्रावर दिवस संपणार होता.
 
लँडर आणि रोव्हरला इलेक्ट्रिसिटीची गरज असते. चंद्रावर सौर उर्जेचे पॅनल सूर्यप्रकाशावर चालतात. मात्र आता रात्र असल्याने त्यांना वीज मिळत नाहीये.
 
चंद्रावर रात्रीचं तापमान वेगाने कमी होतं. NASA च्या मते ते उणे 130 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागात तापमान उणे 253 डिग्री असण्याची शक्यता आहे.
 
इतक्या कमी तापमानात रोव्हर आणि लँडर गोठून जातात. चंद्रावर सूर्य उगवेपर्यंत तिथे अशीच परिस्थिती असते. सप्टेंबर 22 पर्यंत तिथे सूर्यप्रकाश असेल त्यामुळे त्यांना पुन्हा चालवणं हे एक आव्हानात्मक काम असू शकतं.
 
“रात्रीच्या वेळी चंद्रावरचं तापमान उणे 200 डिग्री होतं. अशा वातावरणात बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं खराब होणार नाहीत हे खात्रीने सांगता येत नाही. मात्र आम्ही काही चाचण्या केल्या. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की विक्रम आणि प्रज्ञान इतकं तीव्र वातावरण सहन करून शकणार नाही आणि काम करू शकणार नाही,” असं इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी याआधी सांगितलं होतं.
 
जर तो सक्रिय झाला नाही तर?
प्रज्ञान रोव्हर सध्या निद्रिस्त अवस्थेत आहे. 22 सप्टेंबरला इस्रो त्याला जागं करण्याचा प्रयत्न करणार आहे. इस्रोच्या मते बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे.
 
लँडर आणि रोव्हरचे रिसिव्हर सुरू आहेत. जर रोव्हर आणि लँडर सुरू झाले तर चंद्रावरची माहिती पृथ्वीवर पाठवतील जशी या आधी पाठवली आहे. नाहीतर इस्रोच्या मते तो भारताचा दूत म्हणून कायमस्वरुपी तिथे राहील.
 
जर ते सक्रिय नाही झाले तर पुढे काम करण्याच्या शक्यता किती आहेत? असं झालं तर इतर देशांचे रोव्हर प्रज्ञान कडून गुप्त माहिती गोळा करण्यात यशस्वी ठरतील का हा मुख्य प्रश्न आहे.
 
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आंध्र विद्यापीठाच्या अंतराळ विज्ञान विभागाचे प्राध्यापक पी. श्रीनिवास यांच्याशी आम्ही संवाद साधला.
 
पी. श्रीनिवास आंध्र विद्यापीठातर्फे इस्रो च्या Geo Sphere Bio Sphere या प्रकल्पावर गेल्या सहा वर्षांपासून काम करत आहेत.
 
चंद्रायन-3 च्या विविध बाजूंचा अभ्यास करण्यासाठी ज्या भौतिकशास्त्रतज्ज्ञांना इस्रोने पाचारण केलं होतं त्यात श्रीनिवास यांचा समावेश होता.
 
लँडर आणि रोव्हर पृथ्वीवर परत आणता येतात का?
कोणत्याही अंतराळ संशोधन संस्थेतर्फे अशी माहिती गोळा करण्यासाठी अशी उपकरणं एकदाच पाठवण्यात येतात.
 
ती वारंवार पृथ्वीवर आणता येत नाही. त्यांना पृथ्वीवर परत आणण्याचा खर्च इतका असतो की त्यापेक्षा एक वेगळं मिशन हातात घेणं जास्त सोपं असतं.
 
लँडर आणि रोव्हरने आता काम नाही केलं तर त्यांचं काय होईल?
जर 22 सप्टेंबरला चंद्रावर सूर्यप्रकाश आल्यानंतरही लँडर आणि रोव्हरने काम करणं थांबवलं तर त्यांचं काम कायमचं थांबेल.
 
कारण त्यांची निर्मिती अशा पद्धतीने केलं होतं की त्यांचं जीवनमान फक्त 14 दिवसांचं असेल.
 
काम न करणारे रोव्हर आणि लँडर चंद्रावर कचरा म्हणून पडलेले असतात.
 
भविष्यात ते पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात का?
ते पुन्हा सक्रिय होऊ शकत नाही. ते व्हावे यासाठी प्रयोग सुरू आहेत, मात्र असं कोणतंही तंत्रज्ञान आतापर्यंत विकसित झालेलं नाही.
 
येत्या काळात एखादं रोव्हर सक्रिय होण्यासाठी एखादं दुसरं रोव्हर पाठवण्याची प्रकिया सध्या तरी अजून फळाला आलेली नाही.
 
असं जर झालं तर आपली नादुरुस्त झालेली गाडी दुरुस्त करून पुन्हा एकदा सुरू करता येईल. मात्र हे होण्यासाठी अद्याप बराच अवकाश आहे.
 
रोव्हर आणि लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर काम करत नाहीत आणि ते चंद्रावरचा कचरा असल्याचं समजलं जातं.
 
त्यामुळे तिथे टिकाव धरून राहणं कठीण आहे. निरुपयोगी झालेल्या रोव्हरकडून कोणतीही माहिती गोळा करता येत नाही. कारण चंद्राच्या वातावरणात काही निष्क्रिय झालं तर कायम तसंच राहतं.
 
प्रज्ञान रोव्हरकडून माहिती घेण्यासाठी परदेशातून रोव्हर पाठवतील का?
जर एखाद्या देशाने पुढे कधीतरी लँडर आणि रोव्हर पाठवलं तर प्रज्ञान आणि विक्रमकडून त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. सध्या कोणतंही प्रज्ञान रोव्हर तिथे नाही. तसंच ते प्रज्ञान रोव्हर पाहू शकत नाही.
 
चंद्रावर गेलेले परदेशातले रोव्हर प्रज्ञान रोव्हरकडून कोणतीही माहिती गोळा करू शकणार नाहीत.
 
कारण जेव्हा लँडर किंवा इतर गोष्टी एखादा देश अवकाशात पाठवतो तेव्हा ते सगळी माहिती शेअर करतात. त्यामुळे कोणतीच नवीन माहिती गोळा केली जात नाही.
 
रोव्हरने गोळा केलेली माहिती अतिशय कामाची असणार आहे. मात्र त्यांच्यात कोणतीही गुप्त माहिती नाही. त्यांचं उत्पादन करताना त्यांचं जीवनमान ठरलेलं असतं त्यामुळे नंतर कोणतीही माहिती गोळा करता येत नाही.