बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (08:05 IST)

काँग्रेस पक्ष भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी इतका उतावीळ का झाला आहे?

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या काँग्रेसच्या कथित टूलकिटचा मुद्द्यावरून वाद सुरु आहे. त्यासंदर्भात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी काँग्रेस पक्ष इतका उतावीळ का झाला आहे?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 
 
“वेगळी विचारसरणी असू शकते, पण…”देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून काँग्रेसवर टूलकिट प्रकरणावरून निशाणा साधला आहे. “आपल्या सर्वांमध्ये वैचारिक मतभेद अशू शकतात. वेगळ्या विचारसरणी, मतं आणि श्रद्धा असू शकतात. पण काँग्रेस पक्ष भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी इतका उतावीळ का झाला आहे? काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.