गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (11:51 IST)

युट्युब व्हिडिओ बघून नवऱ्याने घरीच ॲक्युपंक्चरद्वारे बायकोची प्रसूती केली, पत्नी- मुलाचा मृत्यू

YouTube व्हिडिओंना बळी पडणे एका पुरुषासाठी इतके महाग ठरले की त्याने आपल्या पत्नी आणि मुलाचा जीव गमावला. एक 36 वर्षीय केरळ महिला आणि तिच्या नवजात बाळाचा घरी अयशस्वी प्रसूतीमुळे मृत्यू झाला. 

पत्नीला पतीने घरीच बाळंतपण करण्यास भाग पाडल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षित प्रसूतीसाठी महिलेच्या पतीने तिला रुग्णालयात नेले नाही, उलट यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून तिची प्रसूती सुरू केली. घरात मुलाला जन्म देताना महिलेचा मृत्यू झाला.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मंगळवारी तिरुअनंतपुरमच्या नेमोम भागात ही घटना उघडकीस आली. बुधवारी पोलिसांनी पती नयस यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की इतर लोकांचा विशेषत: त्याची पहिली पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांचा सहभाग तपासला जात आहे.
 
हेल्थ वर्क्सने दिलेल्या माहितीनुसार, शमीरा बीवी असे मृत महिलेचे नाव आहे. यापूर्वी तिची तीन सिझेरियन प्रसूती झाली होती. मंगळवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशात आरोपी नायसच्या पहिल्या पत्नीने, जी गेल्या दोन आठवड्यांपासून त्याच्या घरी राहत होती, तिने नायससोबत घरी यूट्यूब व्हिडीओ पाहून मुलाला जन्म देण्याचा प्रयत्न केला, पण असे यशस्वीपणे पार पाडणे शक्य झाले नाही. शमीरा कोमात गेली तेव्हा नायसने तिला रुग्णवाहिकेत एका खासगी रुग्णालयात नेले, जिथे आई आणि नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आले.
 
तिरुअनंतपुरम नगरपालिकेचे नगरसेवक यांनी सांगितले की, आरोपी नायस आपल्या पत्नीला आधुनिक उपचार देण्याच्या विरोधात होता. आशा कार्यकर्त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला असता नायसने त्यांना पत्नीला भेटू दिले नाही. युट्युब व्हिडीओजच्या मदतीने आपल्या इतर मुलांचाही घरी जन्म झाल्याचा दावा त्याने केला आहे. या महिलेची यापूर्वी तीन सिझेरियन प्रसूती झाली होती अशात त्यांना सांगितले गेले होते की नॉर्मल डिलिव्हरी शक्य नाही. पण नायसने आपल्या पत्नीला संस्थात्मक काळजी घेऊ दिली नाही. महिलेला हॉस्पिटलमध्ये जायचे होते पण तिला पतीची भीती वाटत होती. जर तिने त्याचा निर्णय मान्य केला नाही तर तो तिला सोडून देईल, अशी धमकी आरोपीने पत्नीला दिली होती.