बुधवार, 30 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (14:16 IST)

मोमोज खाल्ल्याने विषबाधा होऊन महिलेचा मृत्यू

momos
तेलंगणातील हैदराबादमधील बंजारा हिल्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी एकाच विक्रेत्याकडून मोमोज खाल्ल्याने एका 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून इतर 15 जणांना विषबाधा झाली. यानंतर फूड स्टॉल चालवणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अन्नातून विषबाधा अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकारींनी सांगितले की, रविवारी एका महिलेने मोमोज खाल्ले त्यानंतर तिची प्रकृती खालवली. 'या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्टॉल चालवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
तसेच रस्त्यावरील अन्न खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे लोकांनी सांगितले. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik