1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Women allowed to carry knives inside Delhi Metro

दिल्ली मेट्रोत महिलांना चाकू, आगपेटी आणि लाईटर ठेवण्याची सूट

नवी दिल्ली- छेडखानीच्या प्रकरणांमुळे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अता दिल्ली मेट्रोत महिला आपल्या सुरक्षेसाठी स्वत:जवळ लहान चाकू ठेवू शकते. या निर्णयासोबतच लाईटर आणि आगपेटी ठेवण्याची बंदीही हटविण्यात आली आहे. महिला चार इंच पेक्षा लहान चाकू आणि आगपेटी स्वत:जवळ बाळगू शकतात.
 
चाकू ठेवण्याच्या निर्णयाचा स्वागत केला जात आहे परंतू आगपेटी आणि लाईटरची परवानगीवर मेट्रोची सुरक्षा बघणारी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्यॉरिटी फोर्स(CISF) ने म्हटले की शास्त्री नगर डिपोवर या वस्तूंची भरमार आहे. दररोज किमान 100 लाईटर आणि आगपेट्या जप्त करण्यात येतात.
 
एवढंच नव्हे तर आता मजदूरही मेट्रोत स्वत:बरोबर टूल्स घेऊन जाऊ शकतात, या संदर्भात अनेक लेबर्स ने आग्रह केला होता. आपल्यासोबत टूल्स घेऊन जाणार्‍टाचे नाव नोंदवण्यात येतील.
पुढील लेख
जुन्या नोटांचा हिशेब लवकरच: रिझर्व्ह बँक