1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (17:25 IST)

साकेत कोर्टात महिलेवर दिवसाढवळ्या फायरिंग

शुक्रवारी सकाळी साकेत कोर्टात वकिलाच्या वेषात असलेल्या एका व्यक्तीने एका महिलेवर गोळीबार केला. आरोपींनी महिलेवर 4 गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. एकूण पाच राऊंड गोळीबार करण्यात आला, त्यापैकी चार राऊंड महिलेवर, तर एक गोळी वकील अजयसिंह चौहान यांना लागली. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा निलंबित वकील असून गोळी झाडलेली महिला त्याच्या ओळखीची आहे. दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होता, त्यातूनच त्याने गोळी झाडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
 
लॉयर्स ब्लॉकजवळ घडलेल्या या घटनेने संपूर्ण कोर्टात खळबळ उडाली आहे. घटनेदरम्यान वकील न्यायालयात पोहोचले होते. ब्लॉकच्या आजूबाजूला काही वकील होते.
 
पीडितेचा पती अरुण रामास्वामी यांनी सांगितले की, मी खटल्याच्या सुनावणीसाठी सकाळी 10 वाजता कोर्टातून बाहेर पडलो. त्यानंतर काही वेळातच माझ्या पत्नीला गोळी लागल्याची माहिती मिळाली. आरोपी कामेश्वरने त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 10.30 वाजता घडली. राधा (40) असे जखमी महिलेचे नाव आहे. पीडितेच्या पोटात दोन आणि हातात एक गोळी लागली आहे. महिलेवर मॅक्स साकेत येथे उपचार सुरू आहेत. कामेश्वर कुमार सिंग असे आरोपीचे नाव आहे.
 
हल्लेखोराला बार कौन्सिलमधून निलंबित करण्यात आले आहे. पतीने राधाविरुद्ध 420 चा गुन्हा दाखल केला होता, ज्याची सुनावणी साकेत न्यायालयात सुरू होती.