गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (22:55 IST)

Women's Reservation Bill महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले

Women's Reservation Bill
Women's Reservation Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक राज्यसभेत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आले, म्हणजे विरोधात एकही मत पडले नाही. विधेयकाच्या समर्थनार्थ एकूण 215 मते मिळाली.
 
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महत्त्वाच्या विधेयकावर 2 दिवस चर्चा सुरू आहे. दोन्ही सभागृहातील 132 सदस्यांनी अतिशय अर्थपूर्ण चर्चा केली. सर्वच राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्त्रीशक्तीला विशेष मान मिळाला आहे.
 
विधेयकाच्या विरोधात कोणीही मतदान केले नाही. सभागृहात उपस्थित सर्व 215 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार आहे. त्यांची मंजुरी मिळताच हा कायदा होईल. हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळेल.