शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 एप्रिल 2017 (11:03 IST)

योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा

yogi adityanath z plus suraksha
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून त्यांना व्हीव्हीआयपी व्यक्तींना असलेली सशस्त्र सुरक्षा रक्षकांची झेड प्लससुरक्षा पुरविण्यात येते. गुप्तचर विभागाने आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर संभाव्य धोका निदर्शनास आणून दिल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत आदित्यनाथ यांच्यासोबत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे 25-28 सशस्त्र कमांडो कायम सोबत असतील. ते देशभरात जेथे जातील, तेथे कमांडो त्यांच्यासोबत असतील.