मंगळुरूमध्ये तरुणाची चाकू मारून हत्या, तणावाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू
कर्नाटकातील मंगळुरूच्या हद्दीतील कटिपल्ला येथे काल रात्री एका अल्पसंख्याक समाजाच्या तरुणाची
दोन जणांनी चाकू भोसकून हत्या केली. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. जलील असे मृताचे नाव आहे. जलील हे त्यांच्या दुकानासमोर उभे असताना त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार केले. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंगळुरूमधील सुरतकल, बाजपे, कावूर आणि पानंबूर पोलीस स्टेशन परिसरात आज सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजेच 25 डिसेंबरपासून 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान 27 डिसेंबरच्या सकाळपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असेल.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या घटनेवर वक्तव्य केले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलीस आवश्यक ती कारवाई करतील. लोकांनी शांतता राखावी.
Edited By- Priya Dixit