असा आहे कोरेगाव पार्क परिसर
PR
PRओशो आश्रम, हॉटेल ताज ब्ल्यू डायमंड, जर्मन बेकरी यासह ज्यू लोकांचे महत्त्वाचे ठिकाण असलेले छाबड हाऊसही या बेकरीपासून जवळ आहे. ओशो आश्रमात देश-परदेशातील लोक साधनेसाठी येत असतात. ओशो येथे राहिले होते. त्यांची प्रवचने येथे व्हायची. त्या आधीपासूनच नोकरदार मंडळी मंडळी निवृतीनंतरचे आयुष्य व्यतीत करण्यासाठी या भागाला प्राधान्य देत. त्यानंतर हा परिसर उच्चभ्रू लोकांचे वस्तीस्थान बनला आहे.
काय आहे जर्मन बेकरी?
जर्मन बेकरी हे पुण्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. पुण्याच्या कोरेगाव परिसरात गेल्या दोन दशकांपासून जर्मन बेकरी प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटकांचा येथे कायम राबता असतो. ओशो आश्रम व ज्युईश सेंटर या दोन कारणांमुळेही येथे परदेशी पर्यटक कायम येत असतात. येथे बेकरी पदार्थ व कॉन्टेनेंटल फूड अतिशय वाजवी दरात मिळते. इथले पदार्थही चविष्ट असतात अशी त्याची ख्याती आहे.
जर्मन बेकरीजवळ असलेले छाबड हाऊस हे ज्यूंचे विश्रांतीस्थळ आहे. मुंबईत 26-11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेले नरीमन हाऊसही देखील ज्यू लोकांचे होते. अमेरिकेत पकडलेला डेव्हिड हेडली नरिमन हाऊसप्रमाणेच छाबड हाऊस परिसरातही येऊन गेला होता.
