बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :हृषीकेश , शनिवार, 12 सप्टेंबर 2015 (09:47 IST)

गुरूला भेटण्यासाठी मोदी हृषीकेशला गेले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तराखंडची देवभूमी हृषीकेश येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवत काँग्रेस इतिहासजमा होईल म्हटले आहे. मोदी म्हणाले, ‘आता लोकांचे मनपरिवर्तन झाले आहे. आम्ही मुलींसाठी शाळांमध्ये टॉयलेटची व्यवस्था केली. गरिबांसाठी बँकांचे दरवाजे उघडले. पंतप्रधान मोदींचे गुरू स्वामी दयानंद गिरी हृषीकेशमध्ये राहतात, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते आले होते.
 
गुरुवारी, भोपाळमध्ये विश्व हिंदी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी कार्यकर्तशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसने पावसाळी अधिवेशन चालू दिले नाही असा आरोप त्यांनी केला. 
 
शुक्रवारी, हृषीकेशमध्येही त्यांनी पुन्हा काँग्रेसवर हल्ला केला. हे सकारात्मक राजकारण नसल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत काँग्रेस नामशेष होईल असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, लोक म्हणतील एक काँग्रेस पक्ष होता.
 
गुरुची केली विचारपूस
 
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याआधी पंतप्रधानांनी त्यांचे गुरू स्वामी दयानंद गिरी यांची भेट घेतली. स्वामींच्या गंगा किनार्‍यावरील आश्रमात जवळपास एक तास ते होते. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पाश्र्वभूमीवर उत्तराखंड पोलीस सतर्क होते.