शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (10:50 IST)

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातीच- सीबीआय

भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातीच असल्याचा अहवाल सीबीआयने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला. मुंडे यांचा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

दरम्यान, गेल्या 3 जून रोजी मुंडे यांच्या कारला दिल्लीत अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंडे यांचे दिल्लीतील पृथ्वीराज आणि तुघलक रोडवरील चौकात अपघाती निधन झाले होते.

दुसरीकडे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर भाजपमधील गटातटाचे राजकारणावरून चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मराठवाड्यातील लोकांनी केली होती. सीबीआयने याप्रकरणी अहवाल तयार करून मंगळवारी गृह मंत्रालयाकडे दिला.