जेके: चकमकीत तीन दहशतवादी ठार
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे शनिवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक जवान जखमी झाला आहे.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडामधील एका घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री शोधमोहीम राबविण्यात आली.
