दहशतवाद वाढवण्यासाठी अल-कायदाने आखली योजना
दहशतवादी संघटनांनी येत्या काळात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवून आणण्याच्या तयारी केल्याची गृप्त माहिती मिळाली आहे. इंडियन मुजाहिदीन आणि अल-कायदा या संघाना दहशतवादाला खतपाणी देत आहेत.
इंडियन मुजाहिदीन आणि अल कायदा यांच्यात झालेली माहितीची सांकेतिक देवाणघेवाण आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. या दहशतवादी कटानुसार भारतात वास्तव्याला असणाऱ्या परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची दहशतवादी संघटनांची योजना आहे.
सुरक्षा संस्थांना नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून भारतातील इंडियन मुजाहिदीन व अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेमधील जवळीक वाढवत असल्याची माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वीच अल कायदाने भारतीय उपखंडात संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवणार असल्याची घोषणा केली होती.
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.
