दिगंबर कामत यांच्या घरावर 'ईडी'चा छापा
पणजी- लुईस बर्गर लाचखोरी प्रकरणी आरोप असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानी ईडी अधिकार्यांनी छापा टाकला. मडगावपासून 35 किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला असून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या निवासस्थानीही चौकशी करण्यात आली. पणजीमध्ये त्यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत.
गोव्यातील पाईपलाईन प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनी लुईस बर्गरला काम मिळवून देण्यासाठी दिगंबर कामत यांनी 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
