पटेल समाज आरक्षण आंदोलन चिघळले
पटेल समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळले असून गुजरातमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीस सुरुवात झाली आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून पटेल समाज आक्रमक झाला असून सूरत व अहमदाबादमध्ये आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक करत जाळपोळ केली आहे. अहमदाबाद, सूरत, मेहसाणा, नरोडा आणि जूनागडसह गुजरातमधील अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या, गुजरातचे गृहमंत्री रजनी पटेल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली असून राज्यात निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले आहे.