सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 1 जून 2016 (11:11 IST)

पत्नी कौमार्य परीक्षेत नापास झाल्यान लग्न रद्द!

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जातपंचाच्या आदेशानं नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारीरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग न लागल्यानं पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्याचा फतवा जातपंचांनी सुनावला. कौमार्य परीक्षेत नापास ठरल्यानं पतीनं तिच्याशी वैवाहिक संबंध तोडून टाकला.

मुलगी कौमार्य परीक्षेत अपयशी झाल्याचं निर्वाळा आधी जात पंचायतीनं दिला आणि हे लग्न रद्द ठरवलं. त्यानंतर नवऱ्यानं तिच्याशी संबंध तोडून टाकला.

बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, अंनिस आणि जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.