1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय

मणिपूरच्या हॉटेलमध्ये ग्रेनेड हल्ला

मणिपूरची राजधानी इम्फाळमधील एका हॉटेलवर दहशतवाद्यांनी आज ग्रेनेड हल्ला केला. यातील जिवित वा वित्तहानीची नेमकी माहिती मिळू शकली नाही. पोलिस ग्रेनेड हल्ला करणाऱ्यांच्या शोधात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील हॉटेल भेईगो लिकाईवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी या हॉटेलच्या स्वागत कक्षावर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी हॉटेलच्या खिडक्या आणि गाडीचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.