1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. मन की बात बंदीची मागणी आयोगाने फेटाळली

मन की बात बंदीची मागणी आयोगाने फेटाळली

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.
 
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यामुळे या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसने केली होती. कार्यक्रमाच्या आशयातून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले तरच, अशा प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाईल, असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.
 
आकाशवाणीवरून ‘मन की बात’ हा कार्यक्रम दर रविवारी प्रसारित करण्यात येतो. तक्रार झाली म्हणून लगेचच मंत्रिमंडळ बैठकीत ‘मन की बात’वर बंदी घालण्याचा निर्णय होणार नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयातून किंवा कार्यक्रमाच्या आशयातून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले तरच, कारवाई होईल असे निवडणूक अधिकार्‍याने सांगितले.
 
काँग्रेससह आता आरजेडी आणि जेडीयूनेही ‘मन की बात’वर आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, के.सी. मित्तल, के.सी. त्यागी, पवन वर्मा, मनोज झा यांचे शिष्टमंडळ आयोगाच अधिकार्‍ांना भेटले. पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून आपला राजकीय अजेंडा राबवत आहे. हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असा आरोप जेडीयू नेते अली अन्वर यांनी केला आहे.