माझा पत्ता सांगताना लाज वाटायची : नायडू
दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम झाल्याने आता मला माझा पत्ता सांगताना लाज वाटत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी रस्त्याच्या नामकरणाचे समर्थन केले आहे.
ते म्हणाले, मला औरंगाबाद रोड असा पत्ता सांगायला लाज वाटायची. या रस्त्याला रामेश्वरचे प्रेरणादायी सुपुत्र डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आल्यावर जसे काही विदेशी माणसाचे नाव दिल्याप्रमाणे टीका झाली. पण, या कलाम यांचे नाव देण्याची सूचना कोणत्या हिंदुत्ववादी गटाकडून नव्हे, तर जन्माने पाकिस्तानी असलेल्या एका एका मुस्लिम पत्रकाराने केली होती, असा खुलासा नायडू यांनी केला.