'राधे माँ' करणार होती आत्महत्या!
मुंबई- आपल्याला जेव्हा हुंडा प्रकरणात पोलिसांनी समन्स बजावला तेव्हा आपल्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता, असा खुलासा सुखविंदर कौर उर्फ 'राधे माँ' ने केला आहे. मात्र आत्महत्या करणे चुकीचे असल्याची जाणीव होऊन आपण पोलिस चौकशीला सामोरे जाण्याचे ठरविले असल्याचेही तिने सांगितले.
