वेबदुनिया स्टॉलवर सीएम चौहान
भोपाळच्या लाल परेड मैदानावर आयोजित दहाव्या विश्व हिंदी संमेलनात देश विदेशातून हिंदी रसिक, साहित्यकार आणि पत्रकारांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे. या प्रसंगी विश्वाचे पहिले हिंदी पोर्टल वेबदुनिया हिंदीने देखील प्रदर्शनी लावली आहे.
शुक्रवारी वेबदुनिया द्वारा आयोजित केलेल्या प्रदर्शनीत मप्रचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्यांची बायको साधना सिंह पोहोचले. वेबदुनिया द्वारे देण्यात आलेले स्मृती चिन्ह बघून सीएम फार प्रसन्न झाले.
त्याचबरोबर दुसर्या दिवशी मृणाल पांडे, राहुल देव, स्लमडॉग मिलेनियरचे लेखक विकास स्वरूपासोबत हिंदीचे बरेच मोठे लोकं वेबदुनियाने लावलेली प्रदर्शनी बघण्यासाठी आले.