सलमानची 'हिट अँड रन'ची सुनावणी ढकलली पुढे
बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'हिट अँड रन'प्रकरणी अडचणींच्या भोवर्यात सापडला आहे. सलमानचा वकील आजारी असल्याने या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
सरकारी वकील प्रदीप घरात यांनी बुधवारी कोर्टात सांगितले की, सलमानचे वकील श्रीकांत शिवडे आजारी आहेत. त्यामुळे सुनावणीसाठी पुढील तारीख द्यावी. त्यावर कोर्टाने सुनावणीसाठी ऑक्टोबरमधील तारीख दिली.
दरम्यान, यापूर्वी कागदपत्रे गहाळ झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, यापूर्वी कागदपत्रे गहाळ झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
