1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. सुषमा स्वराजांसाठी जोरदार ‘बॅटींग’

सुषमा स्वराजांसाठी जोरदार ‘बॅटींग’

sushama swaraj
ललित मोदींना केलेल्या मदतीवरुन अडचणीत आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या बचावासाठी भाजपाने जोरदार फिल्डींग लावली आहे.

स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसलेल्या व स्थगन प्रस्ताव आणणाºया काँग्रेसवर बुधवारी अर्थमंत्री अरुण जेटली आणि स्वराज यांनी लोकसभेत तुफानी प्रतिहल्ला चढविला. काँग्रेसने केलेल्या सभात्यागानंतर स्थगनप्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. स्थगन प्रस्तावावरील चचेर्ला उत्तर देताना जेटली यांनी राजीनाम्याची मागणी तर फेटाळलीच, शिवाय राहुल गांधींवर उपहासात्मक हल्ला चढविला.

दरम्यान,  मदत करण्याच्या बदल्यात ललित मोदींकडून किती पैसे घेतले ते स्वराज यांनी सांगावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना स्वराज यांनी खासकरून राहुल गांधींनाच लक्ष्य बनविले.
क्वात्रोचीकडून किती पैसे घेण्यात आले, ते मम्माला विचारा. भोपाळ वायूकांडात १५ हजार लोकांचा बळी घेणाºया अँडरसनला डॅडी राजीव गांधी यांनी का जाऊ दिले, असा सवाल करीत त्यांनी ललित मोदीप्रकरणी पैसे घेतल्याचा आरोप फेटाळून लावला.