1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. BCCIच्या मुंबईतील कार्यालयात शिवसैनिकांचा हंगामा

BCCIच्या मुंबईतील कार्यालयात शिवसैनिकांचा हंगामा

भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुबईत होणार्‍या भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यात येणा-या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी  बीसीसीआय चीफ शशांक मनोहर व पीसीबीचे अध्यक्ष शहरियार खान यांच्या दरम्यान आज बैठक होणार होती, त्यासाठी शहरियार खान मुंबईतही आले होते.  
 
शिवसेनेची पाकिस्तान विरोधी भूमिका अधिक तीव्र झाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान यांना विरोध दर्शवत शेकडो शिवसैनिकांनी आज सकाळी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून निदर्शने केली. 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'शहरियार चले जाव' असे फलक आणि काळे झेंडे फडकावत बीसीसीआयच्या कार्यालयात घुसलेल्या शिवसैनिकांनी भारत- पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तीव्र विरोध दर्शवला.