गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि पूजा
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (08:01 IST)

शारदीय नवरात्री 2022 पूजा विधी

Chaitra Navratri 2022
अशी पूजा करा-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि दारावर आंब्याचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावा, असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाकडी चौकटीवर किंवा आसनावर स्वस्तिक आखून त्यावर मातेची मूर्ती किंवा चित्र बसवावे, त्यानंतर मातीच्या भांड्यात जव पेरावे, जव हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कलशाच्या स्थापनेसोबतच रोळी, अक्षत, मोळी, पुष्प इत्यादी देवीच्या मंत्रांचा उच्चार करून मातेची पूजा करावी. अखंड दिवा लावून आईची आरती करावी.
हे नियम लक्षात ठेवा
शास्त्रानुसार कलश हे सुख,समृद्धी,संपत्ती आणि शुभ कामना यांचे प्रतिक मानले जाते.
कलशात सर्व ग्रह,नक्षत्र आणि तीर्थे वास करतात.
त्याशिवाय ब्रह्मा,विष्णू,रुद्र,सर्व नद्या,महासागर,सरोवरे आणि तेहतीस कोटी देवी देवी कलशात विराजमान आहेत.
वास्तूनुसार, ईशान्य हे पाणी आणि देवाचे स्थान मानले जाते आणि त्यात सर्वात सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे पूजा करताना मूर्तीची मातेची किंवा कलशाची स्थापना या दिशेला करावी.
मातेचे क्षेत्र दक्षिण आणि आग्नेय दिशेला मानले जात असले तरी पूजा करताना पूजकाचे मुख पूर्व या दिशेलाच असले पाहिजे. 
मातेची पूजा करताना कधीही निळे आणि काळे कपडे घालू नयेत, असे केल्याने पूजेचे फळ कमी होते.
देवीला लाल रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे लाल, गुलाबी, भगवा, हिरवा, पिवळा, इत्यादी शुभ रंग मानले गेले आहे.