रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2024
  3. नवरात्र पूजा
Written By
Last Updated : शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (09:27 IST)

Navratri 2024 दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा

Chandraghanta Devi
Chandraghanta Devi : देवी भगवतीची पूजा करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ आहे. नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच दुर्गा देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा होय. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा देवीच्या रूपात दुर्गादेवीची आराधना केली जाते. दुर्गा देवीचे ही तिसरे रूप चंद्रघंटा देवीचे प्राचीन मंदिर हे प्रयागराज मध्ये स्थित आहे. व तिथे देवीची महाआरती करून पूजा केली जाते.  
 
माता दुर्गाचे तिसरे रूप चंद्रघंटा हे खूप सुंदर, मोहक, अद्भुत, कल्याणकारी व शांतिदायक आहे. चंद्रघंटा देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकारात अर्धचंद्र विराजमान आहे. ज्यामुळे त्यांना चंद्रघंटा नावाने ओळखले जाते. अशी मान्यता आहे की, देवी आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन आशीर्वाद देते.
 
धार्मिक मान्यता अनुसार, चंद्रघंटा जगात न्याय आणि शिस्त प्रस्थापित करते. माता चंद्रघंटा हे देवी पार्वतीचे विवाहित रूप आहे. भगवान शिवाशी विवाह केल्यानंतर देवीने आपल्या कपाळावर अर्धचंद्र सजवण्यास सुरुवात केली, म्हणूनच माता पार्वतीला माता चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते.
 
उपासना केल्याने हे फळ मिळत-
चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने भक्तांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख आणि संपन्नता याचे वरदान प्राप्त होतं. चंद्रघंटा मातेच्या कृपेने साधकाची सर्व पापे आणि अडथळे नष्ट होतात. त्यांचे वाहन सिंह आहे, त्यामुळे त्यांचे उपासक सिंहासारखे शूर आणि निर्भय असतात.
 
देवी चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. देवी भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.
 
कोणी करावी चंद्रघंटा देवीची आराधना-
ज्यांना क्रोध येतो किंवा जी व्यक्ती लहान-लहान गोष्टींमुळे विचलित होते ज्यांची ताण घेण्याची प्रवृत्ती असते त्यांनी चंद्रघंटा देवीची भक्ती करावी.
 
पूजा विधी-
देवीला शुद्ध पाणी आणि पंचामृताने स्नान घालावे. विविध प्रकारची फुले, अक्षत, कुमकुम, सिंदूर अर्पण करावे. केशर आणि दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण करा. मातेला पांढरे कमळ, लाल जास्वंदी आणि गुलाबाची माला अर्पण करा आणि प्रार्थना करताना मंत्राचा जप करा.
 
देवी स्तुती मंत्र-
"या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नमः।"
 
पिंडजप्रवरारूढा, चंडकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यं, चंद्रघंटेति विश्रुता।।