बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (15:30 IST)

'भीम’ अॅप चे नवे व्हर्जन दाखल, आता ७ भाषांमध्ये उपलब्ध

bhim app
यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवर (UPI) आधारित मोबाईल अॅप भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) अॅपचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. गूगल प्ले स्टोअरवर नवं व्हर्जन उपलब्ध आहे. एनपीसीआयने ‘भीम’ अॅप 30 डिसेंबरला पहिल्यांदा लॉन्च केलं होतं आणि त्यानंतर पहिल्यांदाच अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे.‘भीम’ अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये म्हणजेच ‘भीम 1.2’मध्ये 7 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी अशा दोनच भाषांमध्ये अॅप उपलब्ध होतं. मात्र आता 1. उडिया, 2. बंगाली, 3. तमिळ, 4. तेलुगू, 5. मल्याळम, 6. कन्नड, 7. गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध आहे.