सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (11:03 IST)

iPhone वर बंपर डिस्काउंट, किती फायदा जाणून घ्या

आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न बघत असाल तर एक चांगली संधी चालून आली आहे. स्वस्त किंमतीत आयफोन खरेदी करायचा असल्यास ही योग्य वेळ आहे ज्यात आपल्याला  iPhone 11, iPhone XR, iPhone SE सारखे मॉडल कमी किमतीत पडतील.
 
८ मार्च पासून Flipkart Smartphones Carnival Sale 2021 सुरू झाला असून यामध्ये iPhone 11, iPhone XR, iPhone SE सारख्या फोनवर बंपर सूट दिली जात आहे.
 
iPhone 11
Flipkart Smartphones Carnival Sale 2021 मध्ये iPhone 11 वर डिस्काउंट मिळत आहे. या फोनच्या ६४ जीबी स्टोरेजचं व्हेरियंट केवळ ४८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येईल. या फोनची सध्याची किंमत ५१ हजार ९९९ रुपये आहे. आपण ८ ते १२ मार्च या दरम्यान या फोनला ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. खास वैशिष्ट्ये - ६.१ इंचाचा डिस्प्ले, A13 Bionic प्रोसेसर, १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा ड्यूअल रियर कॅमेरा.
 
iPhone SE
iPhone SE केवळ २९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत ३९ हजार ९९० रुपये इतकी आहे.
खास वैशिष्ट्ये - ४७ इंचाचा डिस्प्ले, ७ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा.
 
iPhone XR
iPhone XR ३८ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. याची किंमत सध्या ४३ हजार ९९९ रुपये आहे. 
खास वैशिष्ट्ये - ६.१ इंचाचा डिस्प्ले, A12 Bionic प्रोसेसर, १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.