बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (19:08 IST)

शाओमीने दिवाळी सेल, मोठे डिस्काऊंट आणि ऑफर्स

मोबाइल कंपनी शाओमीने दिवाळी सेलच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात केली आहे. शाओमीच्या Diwali with Mi या दुसऱ्या सेलचे आयोजन गुरुवारपासून करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना शाओमीच्या विविध मोबाइल खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट आणि ऑफर्स मिळणार आहे. 
 
Diwali with Mi सेलमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केल्यानंतर 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. मोबिक्विक व्हॉलिटच्या माध्यमातून पैसे भरले तर दोन हजार रुपये कॅशबॅक ग्राहकांना मिळू शकतो. तसेच, निवडक मोबाइलवर कंपनी 3500 रुपयांचे इक्सिगो कूपन सुद्धा देत आहे.  
 
शाओमीच्या दिवाळी सेलमधील काही ऑफर्स...
- रेडमी नोट 5 प्रो या सेलमध्ये 14,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकतात. 
- शाओमीचा सेल्फी स्मार्टफोन रेडमी वाय 2 वर दोन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9,499 रुपयांना मिळत आहे. 
- पोको एफ1 हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना आहे. यावर तीन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.
- एमआय इअरफोन्स बेसिक्स 399 रुपयांना आहेत. मात्र, या सेलमध्ये 349 रुपयांना मिळणार आहेत.
- एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 ए (43 इंच )  22,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना मिळणार आहे. 
- एमआय ब्रँड एचआरएक्स एडिशन ब्लॅक 1299 रुपयांऐवजी 1199 रुपये आहे.
- 20000mAh क्षमतेचा पॉवर बँक 1499 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.