शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (18:31 IST)

सॅमसंगकडून २०० प्रवाशांना Galaxy Note 8 ची भेट

सॅमसंगने सुमारे २०० प्रवाशांना Galaxy Note 8 हा फोन  भेट म्हणून मोफत दिला आहे. 

आईबेरिया एयरलाइन  फ्लाइट संख्या IB 0513 यामध्ये अचानक  २०० प्रवाशांना Galaxy Note 8 गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला. सॅमसंग स्पेनने आईबेरिया एअरलाईंसमध्ये गिव्ह अवे ही योजना आखली होती. या प्रोग्राम अंतर्गत डोमेस्टिक फ्लाईटमध्ये नोट 8 प्रवासांना दिला. त्यानंतर सुखावलेल्या प्रवाशांनीदेखील सेल्फी, व्हिडिओ काढून सोशल मीडीयामध्ये  हे खास क्षण शेअर केले आहेत. 

कंपनीच्या वाईट काळामध्येही ग्राहकांनी कंपनीला साथ दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी प्रवाशांना भेट म्हणून फोन मोफत दिल्याचे कंपनीने सांगितले आहे. यंदा सॅमसंगने Galaxy Note 8 लॉन्च केला आहे.