मोटो झेड आणि मोटोमॉडची फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्री
मोटोरोला कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन मोटो झेड आणि मोटोमॉडची सोमवारी मध्यरात्रीपासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्री सुरू होत आहे. मोटो झेडमध्ये टर्बो बॅटरी चार्जिंगची सुविधा देण्यात आल्याने केवळ १५ मिनिटांतच बॅटरी चार्ज करता येणार आहे. तर अँड्रॉईड मॅशमेलो ६.०.१ या ऑपरेटींग् सिस्टिमवर हा फोन चालणार आहे. याशिवाय डिस्प्ले ५.५ QHD चा असेल. ४ जीबी रॅम, ३२/६४ जीबी इंटरर्नल मेमरी आणि २ टीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी अशी त्याची वैशिष्ट्ये असतील. सोबतच स्मार्टफोनची जाडी केवळ ५.२ मि.मी. असल्याने हा जगातला सर्वात पातळ प्रिमियम स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मोटो झेड च्या बॅक पॅनलला मॉड डिव्हाईस देण्यात येणार आहे. त्यात जेबीएलचे स्पीकर, प्रोजेक्टर वैशिष्ट्यपूर्ण बॅक पॅनल्स आणि पॉवरबँक अशा सुविधा असतील. मोटोमॉडच्या साह्याने बॅकपॅनलचे रुपांतर झुमची सोय असलेल्या कॅमेऱ्यात करता येणे शक्य आहे. त्यामुळे हा वेगळा अनुभव असणार आहे. मोटो झेड साधारपणे ४० हजार, तर मोटो प्ले २५ हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे. तर मोटो मॉडच्या प्रत्येक डिव्हाईससाठी वेगळी किंमत मोजावी लागणार असून ती १५ हजारापर्यंत आहे.