मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

मोटोरोलाकडून चक्क मराठीतून ट्वीट

मोटोरोलानं आपलं अधिकृत ट्विटर अकाउंट असलेल्या मोटो इंडियावरुन चक्क मराठीतून ट्वीट केले आहेत. ‘पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल! लवकरच, काहीतरी दमदार होणार आहे!’ असं ट्विट मोटोरोलानं केलं आहे. 
 
मोटोरोला Moto G5 हा आपल्या नवा स्मार्टफोन 4 एप्रिलला भारतात लाँच करणार आहे. मात्र, त्याआधी मोटोरोलानं प्रमोशनसाठी एक नवा फंडा वापरल्याची चर्चा झाली सुरु आहे. कारण की, मोटोरोलानं आपलं अधिकृत ट्विटर अकाउंट असलेल्या मोटो इंडियावरुन चक्क मराठीतून ट्वीट केले आहेत.