1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
  4. OPPO Reno16 series goes on first sale in India

OPPO Reno16 सिरीजची भारतात पहिली विक्री सुरू! जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

भारतात OPPO Reno16 सिरीजची पहिली विक्री सुरू; किंमत, लॉन्च ऑफर्स आणि कुठे खरेदी करावी? जाणून घ्या
ओप्पो इंडियाने (OPPO India) आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन लाइनअप OPPO Reno16 सिरीजच्या पहिल्या विक्रीची (First Sale) घोषणा केली आहे. या सिरीजमध्ये Reno16 आणि Reno16c या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने OPPO Bubble हा कॅमेरा कंपॅcompanionन (ऍक्सेसरी) देखील बाजारात आणला आहे.  ९ जुलै २०२६ पासून हे दोन्ही स्मार्टफोन आणि ओप्पो बबल खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.
 
भारतात किंमत किती? 
१. OPPO Reno16:  
8GB RAM + 256GB स्टोरेज: ₹६१,९९९
12GB RAM + 256GB स्टोरेज: ₹६७,९९९२. 
 
OPPO Reno16c:  
8GB RAM + 128GB स्टोरेज: ₹४६,९९९
8GB RAM + 256GB स्टोरेज: ₹४९,९९९
12GB RAM + 256GB स्टोरेज: ₹५५,९९९३. 
 
OPPO Bubble: ₹७,९९९  
हे स्मार्टफोन स्टारी व्हाईट, स्टेलर पर्पल आणि ट्वायलाइट व्हायलेट अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.  
 
धमाकेदार लॉन्च ऑफर्स
OPPO Reno16 सिरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत:  
१०% इन्स्टंट कॅशबॅक: निवडक बँक पार्टनर्सच्या क्रेडिट कार्ड आणि UPI ट्रान्झॅक्शनवर १०% पर्यंत कॅशबॅक मिळेल.
नो-कॉस्ट EMI: प्रमुख फायनान्सर्सकडून १८ महिन्यांपर्यंतच्या 'झिरो डाऊन पेमेंट' योजना उपलब्ध आहेत.  
₹५,००० एक्सचेंज बोनस: जुना फोन एक्स्चेंज केल्यास ५,००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त बोनस मिळेल.  
स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन: कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय १८० दिवसांचे स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन दिले जात आहे.  
इअरबड्सवर ५०% सूट: ही सिरीज खरेदी केल्यास 'OPPO Enco Buds3 Pro+' वर तब्बल ५०% सूट मिळेल.  
 
कुठे खरेदी करावी? 
ग्राहक ही सिरीज आणि ओप्पो बबल खालील प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात:  
अॅमेझॉन
फ्लिपकार्ट
ओप्पो ई-स्टोअर
प्रमुख रिटेल स्टोअर्स 
 
मुख्य वैशिष्ट्ये 
डिझाईन: यामध्ये भारतातील पहिले 'HoloVerse 3D Design' वापरण्यात आले आहे, जे फोनच्या मागील भागाला आकर्षक लुक देते.
प्रोसेसर: Reno16 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 (Snapdragon 7 Gen 4) तर Reno16c मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 (Dimensity 7300) प्रोसेसर आहे.  
कॅमेरा: मुख्य मॉडेलमध्ये ५०MP चा प्रायमरी कॅमेरा, ५०MP चा टेलिफोटो लेन्स (3.5× झूम) आणि ५०MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. 
सेल्फीसाठीही ५०MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: Reno16 मध्ये ६,७००mAh तर Reno16c मध्ये तब्बल ७,०००mAh ची मोठी बॅटरी आहे, जी ८०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सुरक्षा: दोन्ही फोन्सना धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळाले आहे.  
About Writer
रूपाली बर्वे
मीडिया क्षेत्रातील २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रूपाली बर्वे या एक अष्टपैलू पत्रकार आणि संपादक आहेत. मागील २० वर्षांपासून त्या 'वेबदुनिया' पोर्टलशी जोडलेल्या असून सध्या 'असिस्टंट एडिटर' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी फील्ड रिपोर्टिंग, कंटेंट रायटिंग, डेस्क एडिटिंग आणि डिजिटल मीडिया अशा विविध स्तरांवर काम केले असून, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती.... आणखी वाचा