गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

मानवी हालचालींद्वारे चार्ज होईल स्मार्टफोन

स्मार्टफोन, फिटनेस ट्रँकर यांसारख्या गॅजेटचे चार्जिग करण्यासाठी आता विजेची गरज भासणार नाही. केवळ मानवी हालचालींद्वारे ऊर्जा घेऊन त्याचा पुरवठा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना करू शकणारा डिव्हाइस शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अतिशय पातळ असलेल्या काळ्या फॉस्फरपासून हा डिव्हाइस तया करण्यात आला आहे. हा डिव्हाइस अतिशय हलक्या तीव्रेतेने वाकवला अथवा दाबला गेला, तरीही एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे ऊर्जा निर्माण करण्यात येते. अशा प्रकारे भविष्यात आपण स्वत:च आपली वैयक्तिक उपकरणे चार्ज करू शकतो, असे अमेरिकेतील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक कॅरी पिंट यांनी सांगितले.
 
मानवी हालचालींमधून ऊर्जा घेणार्‍या अन्य डिव्हाइसपेक्षा या डिव्हाइसमध्ये दोन मूलभूत फायदे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यामध्ये वारपण्यात आलेले साहित्य अतिशय पाळत आणि लहान असल्याने ते मूळ उपकरणाच्या आकाराला धक्का न पोहोचवता सहजपणे बसवता येऊ शकते. त्याबरोबर 10 हर्ट्‍झ म्हणजेच प्रतिसेकंद 10 आवर्तने इतक्या कमी तीव्रतेच्या हालचालींमधूनही ऊर्जा मिळवू शकते. इतक्या कमी तीव्रतेच्या हालचालींमधून उपयुक्त ऊर्जा मिळवणे हे अतिशय आव्हानात्म काम होते, अशी प्रतिक्रिया वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट करणारे भारतीय वंशाचे विद्यार्थी- संशोधक नितीन मुरलीधरन यांनी सांगितले.
 
हा डिव्हाइस निर्माण करण्यात व त्याच्या चाचण्या घेण्यामध्ये मुरलीधरन यांचा सहभाग होता. मानवी हालचालींमधून ऊर्जा निर्माण करणारे एनर्जी हार्वेस्टर विकसित करण्यासाठी अनेक संशोधक गट प्रयत्नरत आहेत, असे पिंट यांनी सांगितले.