शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (19:38 IST)

सर्वात स्वस्त हँडसेट्स

The cheapest handsets
वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
 
OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपची जबाबदारी डिवाइसमधील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगच्या मदतीनं होते.