बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (12:46 IST)

Dimensity 700 प्रोसेसर सह Vivo Y55s 5 लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y55s 5G चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा Vivo च्या Y सीरीजचा नवीन 5G स्मार्टफोन आहे. आधीची लीक फॉलो करत Vivo Y55s ला मीडियाटेक Dimensity 700 प्रोसेसर सह लॉन्च केले गेले आहे. याशिवाय Vivo च्या या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देखील आहे.
 
Vivo Y55s 5G किंमत
Vivo Y55s 5G ची किंमत 1,699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 20,200 रुपये ठेवण्यात आली आहे. Vivo Y55s 5G ब्लॅक, ब्लू आणि पिंक कलर व्हेरियंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या विक्रीबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, तरी तो Vivo China च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. सध्या फोनच्या जागतिक उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती नाही.
 
Vivo Y55s 5G चे तपशील
फोनमध्ये 6.58 इंच फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे.
 
Vivo Y55s 5G कॅमेरा
Vivo Y55s 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे आणि त्याचे अपर्चर f/1.8 आहे. दुसरा लेन्स 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे, ज्यामध्ये अपर्चर f/2.4 आहे. सेल्फीसाठी Vivo ने या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
 
Vivo Y55s 5G बॅटरी
यात 18W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आहे. चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट उपलब्ध असेल. फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील आहे.