आठ ऑस्करसह स्लमडॉगचे 'जय हो'
अत्यंत उत्कंठा लागलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अपेक्षेप्रमाणे 'स्लमडॉग मिलिनियर'ने बाजी मारली असून या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह आठ पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांना दोन ऑस्कर मिळवून इतिहास घडविला आहे. स्लमडॉगला दहा विभागात नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी दोन नामांकने होती. म्हणजे एकूण दहा नामांकनापैकी आठ पुरस्कार मिळाले आहेत. स्लमडॉगला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजिनल स्कोर), सर्वोत्कृष्ट गीत, उत्कृष्ट पटकथा, छायाचित्रण, ध्वनी मिश्रण, एडिटिंग या विभागात ऑस्कर मिळाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनाही पहिल्यांदाच ऑस्कर मिळाले आहे. याशिवाय भारतातील एक ग्रामीण भागातील पिंकी या मुलीवर आधारीत पिंकी या लघुपटालाही सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरीचे ऑस्कर मिळाले आहे. सीन पेन यांना मिल्कमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, केट विन्स्लेट हिला द रिडर मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हिथ लेजर व पेनेलोप क्रुझ हे सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री ठरले. ऑस्करच्या सोहळ्यात आज स्लमडॉगमधील दोन गाणीही स्टेजवर सादर करण्यात आली. ऑस्करच्या रंगमंचावर पहिल्यांदाच हिंदी गाणी सादर झाली असावीत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर जाहीर झाल्यानंतर निर्मात्यासह देव पटेल, फ्रीडा पिंटो, अनिल कपूर, इरफान खानसह इतर कलावंत व चित्रपटाचा क्रू उपस्थित होता. या विभागात स्लमडॉगला मिळाले ऑस्करसर्वोत्कृष्ट चित्रपट- स्लमडॉग मिलिनियर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - स्लमडॉग मिलनियरए. आर. रहमान (गुलझार) - सर्वोत्कृष्ट गीत स्लमडॉग मिलिनियर ए.आर. रहमान - संगीत (ओरिजनिल स्कोर) स्लमडॉग मिलिनियर सायमन बुफे- उत्कृष्ट पटकथा स्लमडॉग मिलिनियर अंथनी डॉड मेंटल- छायाचित्रण- स्लमडॉग मिलिनियर इयान ताप, रिचर्ड प्रेयके व रेसुल पुकुट्टी - ध्वनी मिश्रण -स्लमडॉग मिलिनियर-ख्रिस डिकन्स- चित्रपट संपादन (स्लमडॉग मिलिनियर)ऑस्कर पुरस्कारांची संपूर्ण यादी