एआर रहमान यांना ऑस्कर मिळणारच
|
प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी रहमान यांना शुभेच्छा देताना त्यांना ऑस्कर मिळण्यासाठी प्रार्थना केली आहे.
रहमान यांनी घईंच्या 'ताल' आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या 'युवराज' या चित्रपटांना सुरांनी सजविले आहे. रहमान यांच्या संगीताला आंतराष्ट्रीय दर्जा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिग्दर्शक मॉटी शर्मा म्हणाले, रहमान यांना मिळालेला पुरस्कार खरोखरीच भारत आणि भारतीय संगीताचा गौरव
आहे. मी स्वत: रहमान यांचा चाहता आहे. मनापासून शुभेच्छा देताना त्यांना ऑस्करचा सन्मान मिळावा,
अशी सदिच्छाही व्यक्त करतो, असे ते म्हणाले. त्यांच्याबरोबर शाहरुख खान आणि इतर कलाकारांनीही रहमान यांना शुभेच्छा दिल्या असून ऑस्कर मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
