मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

ऑस्करसह रहमानला कर सवलत

ऑस्करसह रहमानला कर सवलत
दोन ऑस्कर मिळविणार्‍या संगीतकार ए. आर. रहमानला प्राप्तीकरात सवलत देण्याची घोषणा गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. ऑस्करबरोबर रोख रकमेचाही पुरस्कार असेल तर त्याला सवलत दिली पाहिजे, अशी शिफारस मी करतो आहे, असे श्री. चिदंबरम म्हणाले.

दिल्लीत राजस्व भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. मी या कार्यक्रमासाठी येत असतानाच रहमान यांना ऑस्कर मिळाल्याची बातमी मला कळली, असे सांगून आपण त्याच्यासाठी कर सवलतीची शिफारस करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अशी सवलत देणार का असे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष एस. एस. एन. मूर्ती यांना विचारले असता त्यांनी याबाबत काहीही उत्तर देण्याचे टाळले.