गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

किंगखान विरूध्द बिग-बी वाद भडकला

'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटांवर सध्या पुरस्कारांचा वर्षांव होत आहे. ऑस्करच्या रेसमध्ये असणा-या या चित्रपटाचे कलाकार खुशीत असले तरी या चित्रपटावरून बिग-बी आणि किंग खानमध्ये जुंपली आहे.

या चित्रपटातून भारत दरिद्री असल्याचे दाखविण्‍यात आल्याचे मत व्यक्त करताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर तिव्र नाराजी व्यक्त केली होती. या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाल्यानंतर अमिताभ यांचे मत चुकीचे असल्याचा गवगवा करून त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा संतापलेल्या बच्चन यांनी 'ऑस्कर म्हणजे सर्वकाही नव्हे, याचा एवढा गवगवा करण्यात काहीच अर्थ नाही' अशी धाडशी टिप्पणी केली.

बॉलीवूडचा सुपस्टार म्हणवून घेण्यासाठी शाहरूखने थेट बिग-बी बच्चन यांना आव्हान दिले होते. पण, तो तोंडावर पडला. आता पुन्हा संधी मिळतात शाहरूख ‍अमिताभ यांच्यावर घसरला आहे. 'स्लमडॉग' बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना शाहरूखने ऑस्करच सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो स्लमडॉग हा चांगला चित्रपट आहे, आणि या चित्रपटाला ऑस्कर मिळाला तर माझ्या इतका आनंद कुणालाही होणार नाही. असे सांगताना त्याने अप्रत्यक्षपणे अमिताभ यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याच्या नाक खुपसण्यामुळे पुन्हा किंग खान विरूध्द बिग-बी वाद भडकला आहे. शाहरूखच्या या अगावपणाला अमिताभ कसे उत्तर देतात ते पाहुया..