ganesh chaturthi

स्वतःला सकारात्मक कसे कराल जाणून घ्या

Updated: मंगळवार, 16 मार्च 2021 (17:40 IST)
 
1 स्वतःवर ताबा ठेवा- बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की काहीही नकारात्मक विचार करणार नाही, परंतु आपल्या अवती भोवती घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम करून मनस्ताप करून घेतो. असं होऊ नये या साठी आपल्याला स्वतःवर ताबा ठेवणे महत्वाचे आहे. 
 
2 ध्यान करा- आपल्या मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान सर्वोत्तम मानले आहे. मन शांत असेल तर एकाग्रतेमुळे सकारात्मक विचार येतात. ध्यान केल्याने ऊर्जा मिळते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. या मुळे माणूस कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सक्षम होतो.  
 
3 सकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी भेटा -प्रत्येकामध्ये वैचारिक मतभेद असतातच. काही लोक सकारात्मक विचारांचे असतात ,तर काही लोक नकारात्मक विचारसरणीचे असतात. नेहमी आपण सकारात्मक विचार असणाऱ्याशी भेटावे. जेणे करून त्यांचे सकारात्मक विचार आपल्याला पुढे वाढण्यासाठी प्रवृत्त करतील. म्हणून नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या संपर्कात राहावे.   
 
4 आपल्या लक्ष्या वर स्थिर राहा- आपले ध्येय किंवा लक्ष्य आपल्या आवडीनुसार असावे. जेणे करून त्या लक्ष्य प्राप्तीसाठी आपण सकारात्मक विचार करून त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कराल. या मुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि आपण प्रत्येक परिस्थितीशी लढा देण्यात सक्षम व्हाल. 
 
5 आपल्या मानसिक संरचनेत बदल करा- कोणत्या परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय आहे हे आपल्या वैचारिक सामर्थ्यावर अवलंबून आहे. आपण परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने विचार केला तर ती समस्या लहान होईल आणि आपण त्यावर योग्य निर्णय घेऊ शकाल. नकारात्मक विचार करून आपण समोर आलेल्या समस्येला जास्त मोठी बनवतो. आपल्याला मानसिक विचारांना बदल करायला पाहिजे.  
 
6 सकारात्मक आणि प्रेरक विचार वाचा- असं म्हणतात की आपल्या सभोवताली जसे वातावरण असेल आपले विचार देखील तसेच होतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार असलेल्या गोष्टी वाचाव्या.या मुळे आपल्याला प्रेरणा मिळते. आणि आपले विचार देखील सकारात्मक बनतात कोणतेही काम करायला आत्मविश्वास वाढतो आणि काम यशस्वी होतात.म्हणून नेहमी विचारांना सकारात्मक बनविणारे पुस्तक वाचावे.  
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments